मुंबई : आशिया चषकमध्ये नुकत्याच झालेल्या भारत पाक सामन्यात भारताला पाकिस्तानकडून हार पत्कारावी लागली होती. मोक्याच्या क्षणी अर्शदीप सिंहकडून आसिफ अलीचा अगदी सोपा झेल सुटला होता. त्यामुळे अर्शदीपला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता किक्रेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अर्शदीपला ट्वीट करत मोलाचा सल्ला दिला आहे.
प्रत्येक खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना आपलं सर्वस्व पणाला लावतो, त्याशिवाय आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना आपल्या पाठिंब्याची नेहमीच गरज असते. खेळात तुम्ही कधी जिंकता तर कधी पराभव होतो. क्रिकेट असो अथवा इतर खेळ… कोणत्याही खेळाडूवर वैयक्तिक टीका करणं चुकीचं आहे. अर्शदीप तू घाबरु नकोस… प्रयत्न करत राहा. ट्रोलर्सला मैदानातील खेळातून उत्तर दे.. आम्ही तुझ्या पाठिशी आहोत… पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा!
Every athlete representing the country gives their best and plays for the nation always. They need our constant support & remember, that in sports you win some & you lose some. Let's keep cricket or any other sport free from personal attacks. @arshdeepsinghh keep working hard..
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 6, 2022