Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

गणेशोत्सवात पुण्यात ९०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त

गणेशोत्सवात पुण्यात ९०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त

पुणे : पुण्यातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे.आर.एस डेअरी फार्म या विनापरवाना कारखान्यात छापा मारला आहे. यामध्ये कारखान्यात भेसळयुक्त पनीर बनवत असल्याचे आढळून आल्याने पथकाने कारवाई करून पनीर आणि दूध पावडरचा मोठा साठा जप्त केला आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासन पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे.


अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मे.आर.एस या डेअरी फार्म कारखान्यावर छापा टाकून भेसळयुक्त पनीर जप्त केले. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १ लाख ९७ हजार ७८० रुपये किंमतीचे ८९९ किलो भेसळयुक्त पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरली जाणारी २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीची ५४९ किलो स्किम्ड मिल्क पावडरही जप्त केली आहे.


त्याचबरोबर ४ हजार ५४४ रुपये किंमतीचे २८.४ किलो बी डी पामोलीन तेल असा एकूण सर्व ४ लाख २१ हजार ९२४ रुपये किंमतीचा साठा पथकाने जप्त केला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा पथकाने जागेवरच नष्ट केला आहे. तसेच या बनावट पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेडे पाठवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment