Friday, June 13, 2025

समुद्रात वादळी स्थिती; परराज्यातील नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला

समुद्रात वादळी स्थिती; परराज्यातील नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला

देवगड (प्रतिनिधी) : पश्चिम कोकण किनारपट्टीवर वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने परराज्यातील नौका देवगड बंदरामध्ये आश्रयाला आले आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम किनारपट्टीवर वादळाची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत हवामान खात्याने इशारा दिल्यावर पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या नौकानी देवगड बंदराकडे आपला मोर्चा वळवला आहे. गुजरात राज्यातील सुमारे ३० नौका देवगड बंदरात मुक्कामाला आले आहेत त्याचपाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच


तमिळनाडूमधील नौका देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या आहेत.बंदर अधिकारी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा वादळ परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीमध्ये सूचना आल्याशिवाय देवगड बंदर सोडू नये असा इशारा हवामान खात्याने सर्व मच्छीमाऱ्यांना दिला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदर हे सर्वात सुरक्षित बंदर मानले जाते.


नैसर्गिक रचनेमुळे समुद्रात येणाऱ्या वादळाचा थेट परिणाम बंदरातील नौकांना जाणवत नाही. यासाठी अनेक मच्छिमार नौकांनी देवगड बंदरात आश्रय घेतला असल्याने देवगड बंदर नौकांनी फुलून गेले. आपत्कालीन स्थितीमध्ये सर्व नौका देवगड बंदराचा आश्रय घेतात.मात्र सध्यातरी फक्त कोकणातीलच बोटींनी देवगड बंदरात आश्रय घेतला आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा