लंडन : लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांनी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे.
लिझ ट्रस मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ट्रस यांना ८१,३२६ आणि ऋषी सुनक यांना ६०,३९९ मते मिळाली. पंतप्रधान निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी संपले. निवडणूक निकालापूर्वी आलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्या मागे असल्याचे सांगण्यात आले होते.
बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेली चढाओढ आज अखेर संपली असून ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळाला.