सिचुआन : चीनच्या सिचुआन प्रांताच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागात आज (सोमवारी) ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला, असे चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने सांगितले आहे.
सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या आग्नेयेला सुमारे ४३ किलोमीटर (२६ मैल) १० किलोमीटर खोलीवर भूकंप झाला, असे यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हटले आहे. सिचुआनची राजधानी चेंगडूच्या नैऋत्येस सुमारे १८० किमी (१११ मैल) अंतरावर याचे धक्के जाणवले आहेत. केंद्राने सांगितले की, भूकंपाचे केंद्र लुडिंग शहरात १६ किलोमीटर खोलीवर होते.
काही मिनिटांनंतर, केंद्रानुसार लुडिंगजवळील यान शहराला ४.२ तीव्रतेचा दुसरा भूकंप बसला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
याआधी २०१३ मध्ये, यानला जोरदार भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळी १०० हून अधिक लोक ठार झाले आणि हजारो जखमी झाले होते.