Wednesday, September 17, 2025

चीन, जपान, कोरिया, तैवान या ४ देशांना चक्रीवादळाचा तडाखा

चीन, जपान, कोरिया, तैवान या ४ देशांना चक्रीवादळाचा तडाखा

शांघाय : हिन्नामनोर या यंदाच्या सर्वात विध्वंसक चक्रीवादळामुळे चीन, जपान, कोरिया, तैवान या ४ देशांना चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. चीन, जपान, तैवान आणि दक्षिण कोरियात सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे. चीन, दक्षिण कोरिया, जपानमध्ये बोटी बंदरावर उभ्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमाने रोखण्यात आली आहेत.

चीनच्या पाच शहरांत सुमारे ५० हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चीननंतर आता हे वादळ द. कोरिया आणि जपानच्या दिशेने सरकले आहे. ताशी १७५ किमी वेगाने हे वादळ दक्षिण कोरियात विध्वंस घडवू शकते, असा इशारा हाँगकाँगच्या हवामान विभागाने दिला आहे.

३००० घरे केली खाली

जपानच्या ओकिनावा प्रांतातील मियाकोजिमा व इशिगाकीमध्ये ३ हजार घरे खाली करण्यात आली आहेत. तैवानमध्येही ६०० घरे खाली करण्यात आली असून तेथे बचावकार्य सुरू आहे.

Comments
Add Comment