Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीशिवसेनेला आशिष शेलारांचे सडेतोड प्रत्युत्तर; फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा...

शिवसेनेला आशिष शेलारांचे सडेतोड प्रत्युत्तर; फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा!

मुंबई : फोडा-झोडा सोडा, तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा! असे म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सामनाच्या अग्रलेखावर शिवसेनेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

शेलार यांनी एक पत्रक ट्विट केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. शिवसेना आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दुसऱ्यांना फोडाझोडा काय सांगता… पालिकेच्या मराठी शाळा बंद कुणी केल्या? सचिन वाझेला वसूलीला कुणी बसवले? ख्यातकीर्त डॉ. अमरापूरकर यांचा बळी कुणी घेतला? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसावर गोळ्या झाडणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत कोण बसले? असा सवाल त्यांनी केला आहे. फोडा झोडा सोडा, तुमचे तर मराठी माणसाला गाडा आणि आपला मॉल चालवा हेच मिशन सुरु आहे, त्याचे काय? मराठी माणसात फूट, ही आरोळी १०० टक्के झुट, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, महापालिकेत अमराठी कंत्राटदार, बिल्डर यांनीच पोसले… तीन लाख कोटीचे कमिशन कोणी खाल्ले? गिरणी कामगारांना उध्वस्त कोणी केले? मराठी पोरांना फक्त वडापाव विकायला कोणी लावले..? आणि हे वर्षानुवर्षे मराठीच्या नावाने गळे काढायला मोकळे… आता म्हणे, पुढे चला? कुठे वसई की विरार? की आणखी त्याच्यापण पुढे? असा रोख सवाल त्यांनी केला.

हे मिशन नव्हे “कमिशन”, कर्तबगार नेते पक्ष सोडून गेले… “बंधू” राजांनी वेगळी चूल मांडली.. खासदार, आमदार, नगरसेवक कंटाळले… वाम मार्गाने मिळवलेले मुख्यमंत्री पद गमवावे लागले. हे सगळे अनर्थ एका अहंकारामुळे घडले.. तरी पेंग्विन सेनेचे मुखपत्राच्या अग्रलेखातून दुसऱ्यावर खापर फोडण्याचे मिशन सुरुच. स्वतःचे अपयश झाकायला मराठी माणसाची शाल कशाला पांघरताय? असा सवाल करत त्यांनी सामनाच्या अग्रलेखावर जोरदार हल्लाबोल केला.

आपले अपयश झाकण्यासाठी आता मराठी कविता का आळवताय? आपल्या स्वार्थासाठी भगव्याला का बदनाम करताय? नाचता येईना अंगण वाकडे! स्वतःचे अपयश झाकायला आता पर्याय तोकडे, असे म्हणत आशिष शेलार यांनी थेट उद्धव ठाकरे यांनी चिमटे काढले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -