तेलंगणा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या तेलंगणा दौऱ्यावर होत्या. भाजपाच्या ‘लोकसभा प्रवास योजने’च्या अंतर्गत सीतारमण यांनी कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकुर येथे भेट दिली. यावेळी तेथील एका रेशन दुकानात जात नागरिकांशी चर्चा केली. तेव्हा सीतारमण यांना त्या रेशन दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन त्या चांगल्याच संतापल्या आणि अधिकाऱ्यांना फटकारले आहे.
यावेळी सीतारामन म्हणाल्या, “बाजारात एक किलो तांदळाची किंमत ३५ रुपये आहे, तो तुम्हाला १ रुपयांना दिला जातो. केंद्र सरकार ३० रुपये खर्च उचलते, तर राज्य सरकार फक्त ४ रुपये खर्च देते. पण तेलंगणातल्या सरकारी रेशन दुकानांमध्ये मोदींचे फोटो लावत नाही.”