Thursday, July 25, 2024

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य, दि. ४ ते १० सप्टेंबर २०२२

नवीन संधी मिळतील
मेष –या सप्ताहात शुभग्रहांचे चांगले भ्रमण असल्याने भरपूर आनंदाचे क्षण उपभोगावयास मिळणार आहेत. आपल्या जोडीदाराकडून भरपूर प्रेम आणि सहयोग मिळणार आहे. वैवाहिक आयुष्य आनंदाचे असणार आहे. कुटुंबामध्ये एकता आणि सामंजस्य राहणार आहे.प्रेमी-प्रेमिकांसाठीसुद्धा हा कालावधी उत्तम आहे. कलाकार,खेळाडू यांना नवीन संधी येणार आहेत. त्यामध्ये उत्तम यश प्राप्त होणार आहे. आपल्या सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहेत. सामाजिक प्रतिष्ठांमध्ये वाढ होईल.
अनुकूल बदल होतील
वृषभ – व्यापार व्यवसायामध्ये गुंतवणूक करू नका. हे आपल्यासाठी मोठे कर्ज होऊ शकते. आपल्यासाठी आर्थिक नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे आपल्या जोडीदाराच्या तब्येतीकडे ही आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. आपण पण जास्त दगदग आणि धावपळ करू नये. सप्ताहाच्या मध्यावधीमध्ये आपणासाठी अनुकूल ग्रहमान असणार आहे. जे जातक नोकरी करत आहेत, त्यांना नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही नवीन बदल घडणार आहेत, ते आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहेत. आपल्याला मानसन्मान मिळू शकतो.
हातून चांगली कामे होतील
मिथुन – शुभग्रहांचे भ्रमण आपल्यासाठी चांगले परिणाम देणार आहे. जे जातक स्टॉक मार्केटमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी खूपच उत्तम कालावधी आहे. थोड्या काळात जास्त नफा मिळू शकतो. कलाकार आणि खेळाडूंना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी मित्रपरिवार मजा-मस्ती, पार्टी या आनंदात असणार आहेत. आपण आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण करणार आहात. आपल्या हातून चांगली कामे होणार आहेत. आपल्या कामाचे श्रेय आपल्यास मिळणार आहे. तुम्ही केलेल्या कार्याचे कौतुक होईल. स्वतःची ओळख निर्माण करणार आहात.
लोकप्रियता वाढेल
कर्क – आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धाडसी असणार आहात. आपल्या करिअरमध्ये आपण नवीन प्रयत्न केले तरी आपल्याला यश मिळणार आहे. या सप्ताहामध्ये आपले विरोधक नामोहरम होणार आहेत. या सप्ताहात आपला प्रवास होऊ शकतो. आपण व्यावसायिकदृष्ट्या चांगली प्रगती गाठणार आहात. आपल्या इच्छा खूप कष्टानंतर पूर्ण होणार आहेत. त्यातून तुम्हाला समृद्धी आणि लोकप्रियता चांगले उत्पन्न व लाभ मिळतील. कुटुंबाकडून संपूर्ण सहकार्य मिळणार आहे. तसेच वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्ती सुद्धा आपल्याला सहकार्य करणार आहेत. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.
यश आणि कीर्ती मिळेल
सिंह – आपल्या कार्यक्षेत्रात अतिशय चांगले काम करणार आहात. त्यामुळे इतर व्यक्ती तुमचा आदर्श ठेवतील आणि आपला सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. ज्या व्यक्ती खेळाडू आहेत त्यांना अतिशय चांगले यश मिळणार आहे. मैदानी खेळाचे प्रदर्शन त्यांचे अतिशय उत्तम होणार आहे. त्यांची खूप प्रशंसा होणार आहे. कुटुंबामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असणार आहे. नातेवाइकांकडून एखादी आनंदाची बातमी समजणार आहे. यश आणि कीर्तीमध्ये उत्तरोत्तर वाढ होणार आहे.
गुंतवणूक कराल
कन्या – हा सप्ताह संमिश्र घटनांचा आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. भविष्यात त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. तुमच्या मार्गामध्ये कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे; परंतु खच्चीकरण होऊ देऊ नका. आपल्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असणार आहे. कुटुंब स्थानातील शुभग्रह आपल्याला खूप चांगली फळे देणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. आपल्या कार्यात चांगली प्रगती होईल. आपण नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. हुशारीने गुंतवणूक कराल. आपले राहणीमान उंचावेल.
उत्तम कालावधी
तूळ – शुभग्रहांची साथ त्यामुळे अतिशय अनुकूल काळ. आपल्या समस्या अतिशय चांगल्या प्रकारे सोडवल्या जाणार आहेत. उत्तम कालावधी आहे. समाजामध्ये तुमची पत वाढणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुम्ही मिळवलेली कंत्राटी आणि करार यातून चांगला फायदा मिळणार आहे. या कालावधीमध्ये आपण नवीन व्यवहार करू शकता. नवीन कामे सुरू करू शकता. हे व्यवहार आपणास अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
नशिबाची साथ मिळेल
वृश्चिक – स्वतःला व्यक्त करण्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे. आपल्या सर्व क्षमतांचा वापर करण्यासाठी चांगला काळ आहे. आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगला बदल होण्याची शक्यता आहे. आपणास त्यातून आर्थिक फायदे चांगले मिळतील. वरिष्ठ व अधिकारी यांची कृपादृष्टी असणार आहे. आपला कल्पक दृष्टिकोन आणि संधी यामुळे तुम्हाला अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ आणि मानसिक स्थैर्य लाभेल. प्रवास, उच्च शिक्षण, संवाद नव्या उद्योगाची सुरुवात या दृष्टिकोनातून हा कालावधी चांगला आहे.
मिश्र घटनांचा सप्ताह
धनु – हा कालावधी आपणास मिश्र घटनांचा राहणार आहे. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तींना आकर्षक करून घेऊ शकाल. ज्या व्यक्ती तुमच्या योजना आणि प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी साहाय्य करण्यास तयार असतील. तुमच्या कष्टाचे चीज होण्यासाठी तुम्हाला जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. मात्र भावंडांमध्ये काही समस्या किंवा तणावाचे प्रसंग येऊ शकतात. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी येण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही धार्मिक कार्य होऊ शकते. घरामध्ये एकोपा आणि समजूतदारपणा असणार आहे. व्यावसायिक आयुष्यात उंची गाठाल.
बदल फायदेशीर ठरेल
मकर – तुमची कष्ट करायची तयारी असल्यामुळे हा काळ तुम्हाला निश्चित चांगला जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी होणारे बदल आपणास फायदेशीर ठरतील. आपली निर्णय क्षमता अतिशय चांगली असणार आहे. तुमची आर्थिक आवक निश्चितच वाढणार आहे. भाग्यातील शुभग्रहांमुळे आपल्या कष्टाचे चीज होणार आहे. शंकास्पद व्यवहार निश्चितच टाळा. आपल्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तीकडून आपणास सहकार्य मिळणार आहे. घराचे, बांधकामांची काही कामे असतील, तर ती या काळात करून घ्या.
बढतीची शक्यता
कुंभ – हा सप्ताह आपणास मिश्र घटनांचा असणार आहे. तुमचा पैसा बऱ्याच ठिकाणी अडकल्यामुळे रोख रकमेची कमतरता भासू शकते. आरोग्याच्या तक्रारी तोंड वर काढू शकतात. दशमातील ग्रहांमुळे वरिष्ठांना बरोबर संवाद चांगला राहील. तुमच्या मनात अनेक नवीन नवीन कल्पना येत असतील, पण त्याचा चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंचा विचार करा. नंतर अमलात आणा. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ चांगला होईल. कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे.
प्रयत्नांना यश
मीन – आपल्या प्रयत्नांना यश येणार आहे. तुम्ही स्वतःच्या अडचणींवर मात करणार आहात. तुम्हाला शुभेच्छा आणि आदर मिळणार आहे. अति आत्मविश्वास टाळा. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही प्रगती करणार आहात. उद्योग आणि व्यवसायामध्ये समृद्धी लाभणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन नवीन प्रकल्प समोर येतील. नीट विचार करून स्वीकारा. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांमध्ये निश्चित यश येणार आहे. भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेने आणि चैतन्याने जगाल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -