Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीमहत्वाची बातमी

सोलापुरात मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरुन थेट शेतात

सोलापुरात मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरुन थेट शेतात

सोलापूर : सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली मालगाडी रुळावरुन घसरुन दुर्घटना घडली आहे. करमाळा तालुक्यातील केम येथे हा रेल्वे अपघात घडला. इंजिन थेट शेतात घुसले आहे. ही घटना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. मात्र, यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट वाहून नेणाऱ्या मालगाडीचं इंजिन आणि दोन डबे रुळावरुन घसरले. यानंतर मालगाडीचे इंजिन थेट शेतात घुसले आणि त्यानंतरच थांबले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चौकशीनंतर अपघाताचे कारण समोर येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment