Tuesday, May 20, 2025

ताज्या घडामोडीपालघर

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-टेम्पोची धडक, दोन्ही वाहने जळून खाक

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-टेम्पोची धडक, दोन्ही वाहने जळून खाक

पालघर : मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मेंढवण घाट परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोने गुजरात वाहिनीवर येऊन मक्याचे पीठ घेउन जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यांनतर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत टेम्पो चालक जखमी झाला आहे.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळानंतर या वाहनांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून टेम्पो चालक जखमी झाला आहे. जखमी टेम्पो चालकाला मनोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अपघातानंतर ट्रक आणि टेम्पोला लागलेल्या आगीत दोन्हीही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात वाहिनीवरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले.

Comments
Add Comment