बुलढाणा (प्रतिनिधी) : बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा येथे सत्कार समारंभ सुरू होता. त्यावेळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकत्र आल्याने कार्यकर्तेही एकमेकांना भिडले. कार्यकर्ते पोलिसांसमोरच भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवसेनेच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; परंतु या कार्यक्रमात दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला.
शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा इथे सत्कार समारंभ सुरू होता. दोन्ही गटाचे कार्यकर्ते अचानक पुढे आल्याने कार्यकर्तेही एकमेकांना भिडले. त्यानंतर परिस्थिती निवळण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या वातावरण शांत आहे. दरम्यान, आजपर्यंत दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका केली जात होती; परंतु आता हा संघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडल्याने १५ मिनिटे हा राडा सुरू होता. यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. कार्यक्रमातील काही खुर्च्यादेखील तुटल्या आहेत; परंतु यावेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेच्या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…