Saturday, October 18, 2025
Happy Diwali

मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्यात नासाला यश!

मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्यात नासाला यश!

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्याच्या प्रयत्नांना नासाला यश आले आहे. नासाने मार्सवर पाठवलेल्या टोस्टरच्या आकाराच्या एका यंत्रणाने प्रथमच मंगळाच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन तयार केला आहे. हे संशोधन एका जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

जगभरातील संशोधक अनेक वर्षांपासून मंगळ ग्रहावर सजीवसृष्टीची शक्यता धुंडाळून पाहत आहेत. यासाठी तिथे ऑक्सिजन व पाणी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गत आता नासाला मोठे यश आले आहे. नासाने मार्सवर पाठवलेल्या टोस्टरच्या आकाराच्या एका यंत्रणाने प्रथमच मंगळाच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन तयार केला आहे. हे संशोधन एका जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

या यंत्राचे नाव मार्स ऑक्सिजन इन-सितु रिसोर्स यूटिलायझेशन एक्सपेरिमेंट आहे. हे यंत्र नासाने गतवर्षी पर्सिव्हरेन्स रोव्हर मोहिमेसोबत मंगळावर पाठवले होते. संशोधकांच्या मते, मार्स ऑक्सिजन इन-सितु रिसोर्स यूटिलायझेशन एक्सपेरिमेंट फेब्रुवारी २०२१ पासून सातत्याने मार्सच्या कार्बन डायऑक्साइडने भरपूर असलेल्या वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती करण्यात यशस्वी ठरले आहे.

संशोधकांनी सांगितले आहे की, मार्स ऑक्सिजन इन-सितु रिसोर्स यूटिलायझेशन एक्सपेरिमेंट विविध प्रकारच्या वातावरणात ऑक्सिजन तयार करतो. ते रात्रंदिवस, मंगळ ग्रहावरील कोणत्याही वातावरणात आपल्या कामात यशस्वी ठरला आहे. डिव्हाइसवर ७ प्रयोग करण्यात आले. त्यात प्रत्येकवेळी ताशी ६ ग्रॅम ऑक्सिजन तयार करण्यात आला. पृथ्वीवर एवढा ऑक्सिजन एखादा छोटे झाड तयार करते. एकदा तर या यंत्राणे ताशी १०.४ ग्रॅम ऑक्सिजन तयार केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा