नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : सध्या गणेश उत्सवाची देशभरात धूम आहे. बाप्पाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. हा गणरायाचा उत्सव सातासमुद्रापार देखील साजरा केला जात आहे. हा गणरायाचा उत्सव सातासमुद्रापारही साजरा केला जात आहे. युनायटेड इंडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया या अॅडलेडस्थित शहरमध्ये ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ नावाने प्रचलित गणेश उत्सव साजरा होत आहे. हा उत्सव हा २०१६ पासून साजरा होत असून या वर्षी लालबाग मुंबई येथे बनवलेली २१ फूट उंच गणेश मूर्ती ४५ दिवसांचा बोटीचा प्रवास करून अॅडलेडला पोहोचली.
रविवारी, ४ सप्टेंबर रोजी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. संपूर्ण ऑस्ट्रेलियामधून जवळजवळ १५ ते २० हजार नागरिक येथे भेट देतात, असे भारतीय प्रतिनिधी राजेंद्र झेंडे यांनी सांगितले. भारतातील १० ते १५ वेगवेगळ्या राज्यातील नागरिक तिथे स्थायिक आहेत. ते १६ तासांपेक्षा जास्त वेळ कलेचे सादरीकरण करणार आहेत.
युनायटेड इडियन्स ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया अॅडलेड स्थित कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष राकेश गुप्ता, सचिव मिहिर शिंदे, जनसंपर्क अधिकारी सदानंद मोरे, ग्रांट ऑफिसर कपिल चौसालकर आणि खजिनदार प्रशांत जगदाळे हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहे. ऑस्ट्रेलियाचे अनेक खासदार, सिनेट मेंबर्स आणि सांस्कृतिक मंत्री यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…