दोडामार्ग बनतोय दुर्मीळ खवल्या मांजराचे संवर्धन करणारी भूमी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्गमधील पिकुळे लाडाचेटेंब गावामधील शेतकरी कृष्णा काशीराम महालकर यांना रात्री दोनच्या सुमारास दुर्मीळ असे खवले मांजर आपल्या परसबागेत अडकले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कुत्रे व इतर नैसर्गिक शिकारी यांचेपासून त्याचे संरक्षण करून त्याला अभय दिले. सदरची घटना सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय दोडामार्ग येथे कळविली.


सदरची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय दोडामार्गचे बचावपथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले व ते खवले मांजर वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी ताब्यात घेण्यात आले. त्या खवले मांजरावर वन्यपशुवैद्यकीय डॉक्टर यांचेमार्फत तपासणी करून ते पुर्णतः निरोगी असल्याचे सांगीतल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


जगात सर्वातजास्त शिकार व तस्करी होणाऱ्या या अशा दुर्मीळ खवलेमांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभाग दोडामार्ग येथील वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी खवलेमांजर वाचवा मोहीम राबविली आहे. या अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी दोडामार्ग मदन क्षीरसागर यांनी आपल्या दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी व नागरीक बांधवांना या दुर्मिळ खवलेमांजराच्या संवर्धन व संरक्षणाकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.


या मोहिमेत सहभागी होत खवलेमांजराची माहिती वनविभागाला वेळेत कळवून त्या खवलेमांजराचे प्राण वाचवण्यासाठी वनविभागाच्या वतीने सदर शेतकरी श्री. कृष्णा काशीराम महालकर यांचे आभार मानून त्यांना आपल्या कोकणातील या दुर्मिळ अशा वन्यजीवाच्या, खवलेमांजराच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन म्हणून एक हजार रुपये बक्षीस देण्यात आले. या कामगिरीमध्ये वनक्षेत्रपाल दोडामार्ग कार्यालयाचे वनपाल माणेरी संग्राम जितकर, वनरक्षक दत्तात्रय मुकाडे, वनमजुर विश्राम कुबल, संतोष शेटकर व इतर सर्व दोडामार्ग परिक्षेत्र कार्यालय स्टाफ यांनी महत्वाची भूमिका निभावली.

Comments
Add Comment

‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये

उच्चाधिकार समितीचा निकाल सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर ‘ये-जा’ करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे

कणकवलीत उद्या नगरपंचायतीसाठी मतदान

ईव्हीएमसह अधिकारी - कर्मचारी केंद्रांकडे रवाना कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या (२ डिसेंबर) मतदान

कणकवली बाजारपेठेत भाजपची प्रचार रॅली

कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि १७ नगरसेवक

माझा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांनाच खासदार नारायण राणे यांची स्पष्टोक्ती

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ उमेदवारांनी घेतले खासदार राणे यांचे

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री नितेश राणेंची एन्ट्री

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी अशी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण

अखेरच्या दिवशी सिंधुदुर्गात इच्छुकांची धावपळ

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले नगर परिषद तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक