Saturday, March 15, 2025
Homeमहत्वाची बातमीचीनमध्ये कोरोनाने पुन्हा काढले डोके वर!

चीनमध्ये कोरोनाने पुन्हा काढले डोके वर!

आरोग्य विभागाकडून चाचण्या वाढविल्या

बिजिंग (वृत्तसंस्था) : कोरोनाचे केंद्रबिंदू असलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे चीनने खबरदारीचे उपाय करण्यावर भर दिला आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्या वाढविल्या आहेत. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे.

डालियानमध्येही लॉकडाऊन

स्थानिक आरोग्य प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, चीनच्या ईशान्येकडील दालियान शहरात गुरुवारी १०० हून अधिक कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दालियान शहराची ६० लाख लोकसंख्या आहे. मंगळवारपासून डॅलियनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत शहरात लॉकडाऊन लागू असेल. परिस्थिती पाहता पुढील उपाययोजना केल्या जातील.

बीजिंगमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी

चीनची राजधानी बीजिंग कोरोना विषाणूच्या विळख्यातून बाहेर पडताना दिसत आहे. बीजिंगमध्ये सध्या कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, सरकारने राजधानी बीजिंगमध्ये राहणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. यासोबतच नागरिकांना कोविड चाचणी करण्याचे आवाहन केले जात आहे.

चीनचे ‘झिरो कोविड’ पॉलिसी

कोविडचा वाढता संसर्ग पाहता चीन सरकार अलर्टवर आहे. चीन सरकारकडून अत्यंत सावधगिरीने ‘झिरो कोविड’ पॉलिसी लागू करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने निर्बंध, लसीकरण आणि उत्तम वैद्यकीय उपाययोजना यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -