पटना (वार्ताहर) : यजमान बिहारसह महाराष्ट्राने “४८व्या कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” विजयी सलामी दिली. पटना – बिहार येथील पाटलीपुत्र बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर गुरुवारपासून सुरू झालेल्या “ड” गटातील पहिल्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने ओरिसाचा ३७-१८ असा पराभव केला.
आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात २ लोण देत २४-०६ अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. उत्तरार्धात मात्र सावध खेळ करीत आपल्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
ज्युली मिस्किटाचा अष्टपैलू खेळ तिला मिळालेली रेणुका नमची भक्कम पकडीची व याशिका पुजारीची चढाईची उत्तम साथ यामुळे महाराष्ट्राने हा विजय साकारला. दुसऱ्या सामन्यात गटविजेत्या हरियाणाने दुबळ्या जम्मू आणि काश्मिरचा ६१-०६ असा धुव्वा उडवीत अ गट साखळीत पहिला विजय नोंदविला.
याआधी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली.
“अ” गट :- १) हरियाणा, २) पंजाब, ३) केरळ;
“ब” गट :- १) साई, २) दिल्ली, ३)गुजरात;
“क” गट :- १) चंदीगड, २) पश्चिम बंगाल, ३) कर्नाटक;
“ड” गट :- १) महाराष्ट्र, २) तेलंगणा, ३) ओरिसा;
“इ” गट :- १) आंध्र प्रदेश (CO), २) गोवा, ३) विदर्भ, ४) उत्तराखंड;
“फ” गट :- १) राजस्थान, २) छत्तीसगड, ३) आसाम, ४) त्रिपुरा;
“ग” गट :- १)तामिळनाडू, २) हिमाचल प्रदेश, ३) मणिपूर, ४) मध्य प्रदेश;
“ह” गट :- १) झारखंड, २) उत्तर प्रदेश, ३) बिहार, ४) जम्मू आणि काश्मीर.