
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मेगा प्लान
पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातील वाहतूकीचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक बोलवली होती. पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा घेतला. त्यात पुणे शहरातून अनेक शहरात जाणाऱ्या मार्गात कोणते बदल केले जाणार हे स्पष्ट केले. टाउन प्लॅनिंगनुसार या सगळ्या मार्गाची पुर्रचना होणार आहे. पुणे-शिरुर नगर-औरंगाबाद रस्त्यात तीन मजली उड्डाणपुल होणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.
चांदणी चौकातील पूल येत्या दोन-तीन दिवसात पाडणार असून त्यासाठी नवे कामदेखील लवकर सुरु करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. लवकर काम झाल्यास येत्या जूनमध्ये नव्या पुलाचे उद्घाटन करु, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात इलेक्ट्रिक डबलडेकर बस पुण्यात सुरु करण्याचा विचार आहे, असे देखील ते म्हणाले. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन बसेसची योजना जाहीर केली. त्यासाठी निधी देण्याचेही स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींचा सहभाग यासाठी जास्त महत्वाचे असेल असेही ते म्हणाले.
नॅशनल हायवेच्या बाजूला जागा दिली तर त्या ठिकाणी लॉजीस्टीक पार्क बांधण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठी २ लाख कोटीचे लॉजीस्टीक पार्कसाठी खर्च करणार असल्याचे देखील त्यांनी संगितले.