Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

फसव्या लिंक्स, हॅकर्सपासुन सावध राहण्यासाठी गुगलकडून सुरक्षिततेबाबत सूचना

फसव्या लिंक्स, हॅकर्सपासुन सावध राहण्यासाठी गुगलकडून सुरक्षिततेबाबत सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजकाल गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी वेगवेगळ्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना पाहायला मिळतात. यामुळेच सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. इलेक्ट्रिसिटी स्कॅमसंदर्भात गुगलकडून सुरक्षिततेबाबत व्हिडीओ जारी करत टिप्स दिल्या आहेत.


गुन्हेगार खोट्या लिंकच्या आधारे तुमच्या फोनमधील डेटा चोरून तुमच्या अकाऊंटमधील पैसे लंपास करतात. अनेक वेळा तुमच्या मोबाईल वेगवेगळ्या फसव्या लिंक पाठवल्या जातात. या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या अकाऊंट संदर्भात माहिती भरण्यास सांगितले जाते आणि हीच संधी साधत हॅकर्स तुमचे अकाऊंट हॅक करतात आणि ग्राहकांना चांगलेच गंडा घालतात. असे सायबर गुन्ह्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.


नुकताच इलेक्ट्रिसिटी स्कॅम समोर आला होता. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर तुमचे वीजबील थकल्याचा मेसेज आणि त्यासोबत एक लिंक पाठवली जायची. या लिंकवर तुम्हांला तुमच्या अकाऊंट डिटेल्स आणि इतर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जाते. या बनावट लिंकवरून हॅकर्स तुमचा डेटा चोरतात आणि ग्राहकांना गंडा घालतात. अशी अनेक प्रकरण समोर आली होती. त्यानंतर आता गुगल इंडिया केंद्र सरकारसोबत मिळून ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


यासाठी गुगल इंडियाने सायबर क्राईमपासून सावध राहण्यासाठी काय करायचे, याबद्दलच्या सूचना केल्या आहेत. गुगल इंडियाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सांगितले आहे की, स्कॅमर त्यांच्या मार्गाने अधिक प्रगत होत हॅकींगसाठी नवीन शक्कल लढवत आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहणे आपल्यावर अवलंबून आहे. दोन पाऊल पुढे राहा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि कधीही तुमच्या बँक खात्यासंबंधित तपशील शेअर करू नका. गुगलसोबत सुरक्षित राहा.


गुगलने ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करताना अधिक सुरक्षित राहण्यास सांगितले आहे. कोणत्याही अनोखळी लिंकवर क्लिक करू नका, कारण हॅकर्स बनावट लिंकच्या साहाय्याने तुमची वैयक्तिक माहिती चोरून अनेकांना गंडा घालत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी दोन पाऊले पुढे जात सर्तक राहण्याची गरज आहे. गुगलकडूनही वेळोवेळी असुरक्षित लिंकबाबत सावध केले जाते, त्याकडेही दुर्लक्ष करु नका.

Comments
Add Comment