Saturday, July 13, 2024
Homeक्रीडानीरज चोप्राचा भाला बीसीसीआयने केला खरेदी; लीलावात मोजले १.५ कोटी

नीरज चोप्राचा भाला बीसीसीआयने केला खरेदी; लीलावात मोजले १.५ कोटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा भाला बीसीसीआयने १.५ कोटी रुपयांना लीलावात खरेदी केला आहे. वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारतीय खेळाडूंसाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यात मोदींनी पदकविजेत्यांसह सर्व खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी त्यांनी खेळाडूंना त्यांचे क्रीडा साहित्य ई-लिलावासाठी देण्यास सांगितले होते आणि त्यातून जमा होणारा निधी गंगा नदीच्या संवर्धनासाठी सुरू केलेल्या नमामी गंगे या प्रकल्पात वापरण्यात येणार आहे. सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानेही त्याचा भाला या उपक्रमासाठी दिला होता. तो भाला बीसीसीआयने १.५ कोटी रुपयांना लिलावात खरेदी केल्याचे समजते.

नीरजने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पंतप्रधानांच्या भेटीत भाला भेट म्हणून दिला होता. २०१४ मध्ये नमामा गंगे उपक्रमाला सुरुवात झाली होती. सप्टेंबर व ऑक्टोबर २०२१मध्ये खेळाडूंच्या क्रीडा साहित्याचे ई ऑक्शन झाले. ”बीसीसीआयने नीरज चोप्राच्या भाल्यासाठीची बोली जिंकली. यासह आम्ही अन्य काही गोष्टींवरही बोली लावली आहे. नमामी गंगे हा चांगला उपक्रम आहे आणि देशातील सर्वोच्च क्रीडा संघटना म्हणून यात हातभार लावावा, अशी आमची इच्छा होती. आम्हीही देशासाठी देणे लागतो.”असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -