Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीअफगाणिस्तानमधील मशिदीत झालेल्या स्फोटात मुल्ला मुजीबचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील मशिदीत झालेल्या स्फोटात मुल्ला मुजीबचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मोठा स्फोट झाला. यामध्ये तालिबानचा सर्वात मोठा धार्मिक नेता मुल्ला मुजीब उर रहमान अन्सारी मारला गेला आहे. ही घटना गाजारघ शहरात घडली. गेल्या महिन्यातही तालिबानचा एक प्रमुख नेता मारला गेला होता. या हल्ल्यामागे इसिसच्या खोरासान गटाचा हात असल्याचे मानले जात आहे. याबाबत तालिबानने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाजारघच्या मशिदीमध्ये एकूण २ स्फोट झाले. यावेळी जुम्माची नमाज चालू होती. मुल्ला मुजीब हे या मशिदीचे मुख्य इमाम होते. त्याच्या समोरील रांगेत हा स्फोट झाला. हा फिदाईन हल्ला होता आणि त्यात दोन लोक सामील असल्याचे मानले जात आहे.

लोक बाहेर पळत असताना दुसरा स्फोट झाला. काही वृत्तांनुसार, मुल्ला मुजीब हेरातमधील आर्थिक परिषदेत सहभागी झाल्यानंतर काही तासांनंतर मशिदीत पोहोचला होता. अन्सारींच्या सचिवाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. मुजीब हा तालिबानच्या सर्वात क्रूर नेत्यांपैकी एक मानला जात असे. मुलींच्या शिक्षणाला आणि घर सोडून जाण्यास त्याचा तीव्र विरोध होता. सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्याने फतवा काढला होता. त्यात म्हटले होते की- जर कोणी तालिबान राजवटीला विरोध केला किंवा आदेशांचे पालन केले नाही, तर त्याचा शिरच्छेद करणे हीच त्याची शिक्षा आहे. विशेष म्हणजे हा हुकूम किंवा फतवा तालिबानच्या प्रवक्त्याने मुजीबचे वैयक्तिक मत म्हणून फेटाळून लावला होता.

बुधवारी हेरातमध्येच तालिबान आणि इसिसच्या खोरासान गटामध्ये रक्तरंजित चकमक झाली. या हल्ल्यात आयएसकेपीचे ३ दहशतवादी मारले गेले होते. यानंतर खोरासान गटाने या मृत्यूंचा बदला नक्कीच घेणार असल्याचे सांगितले होते. आयएसकेपी हा तालिबानसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे मानले जाते, ज्यांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी अफगाणिस्तानचे सरकार ताब्यात घेतले. हेरातसह देशातील अनेक भागांत तालिबान आणि आयएसकेपी यांच्यात संघर्ष सुरू आहेत. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडले तेव्हा काबूल विमानतळावर झालेल्या स्फोटामागे आयएसकेपीचा हात होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -