Sunday, August 31, 2025

रवींद्र जडेजाला दुखापत; अक्षर पटेलला मिळणार संधी

रवींद्र जडेजाला दुखापत; अक्षर पटेलला मिळणार संधी

दुबई (वृत्तसंस्था) : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू असली तरी अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या दुखापतीमुळे भारताला धक्का बसला आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याची माहिती बीसीसीआयने शुक्रवारी दिली. त्यामुळे जडेजाला आशिया चषक स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार असून त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात संधी दिली जाणार आहे.

रविंद्र जडेजा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीसीसीआयने अक्षर पटेलला रविंद्र जडेजाची रिप्लेसमेंट म्हणून उर्वरित आशिया कपमध्ये संधी देणार असल्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 'भारताच्या वरिष्ठ निवड समितीने उर्वरित आशिया कपच्या सामन्यांसाठी दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान दिले आहे.

रविंद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. अक्षर पटेलला आशिया कपसाठी स्टँड बाय म्हणून संघासोबत ठेवण्यात आले होते. तो लवकरतच दुबईत संघात दाखल होईल.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा