Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीमनसे पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण

मनसे पदाधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण

पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई : मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप आणि जाहिरात बॅनर उभारण्यावरुन एका महिलेला मनसेचा उपविभागप्रमुख विनोद अरगिले याने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परंतु, सध्या गणेशोत्सव असल्याचे कारण सांगत अद्याप पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती या महिलेने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. मुंबईतील मुंबादेवी परिसरात एका ठिकाणी गणपतीचा मंडप उभारला जात होता. त्याच ठिकाणी बॅनर लावण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांच्या समोर बांबू लावले जात होते. तेथील एका मेडिकल शॉपसमोर काही मनसे पदाधिकारी बांबू लावत होते. त्यावेळी व्हिडीओमध्ये दिसत असलेली प्रकाश देवी या महिलेने ते बांबू लावण्यास विरोध केला. त्यावेळी मनसेचा उपविभाग प्रमुख विनोद अरगिले याच्याकडून महिलेला मारहाण करण्यात आली.

मनसे उपविभागप्रमुख विनोद अरगिले यांचे म्हणणे आहे की, या व्हिडीओमध्ये फक्त एकच बाजू दिसतेय. ती महिला आमच्या अंगावर धावून आली. त्यानंतर तिने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच यापूर्वीही त्या महिलेविरोधात तक्रार केल्याचे विनोद आरगिलेने सांगितले. तसेच, महिलेने आमच्या अंगावर येऊन आमची कॉलर धरणे हे कोणत्या संस्कृतीत बसते. ती आमच्या अंगावर धावून आली म्हणजे, आम्ही आमच्या बचावासाठी काहीच करायचे नाही का? आम्ही महिलांचा आदर करणे गरजेचे आहेच. पण त्यांनीही आमचा आदर राखणे गरजेचे आहे, असेही विनोद अरगिले यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -