मुंबई : भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आशिष शेलार यांनी ट्विट करून राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले असल्याची माहिती दिली आहे. ट्विटरवर फोटो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. दोन दिवसात राज ठाकरे यांना भेटणारे ते तिसरे भाजप नेते आहेत.
याआधी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज ठाकरे यांच्यात वाढत असलेल्या भेटीगाठीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.