Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्ररेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात नेतांना ग्रामस्थांच्या सतर्कतेने मुद्देमाल ताब्यात

रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात नेतांना ग्रामस्थांच्या सतर्कतेने मुद्देमाल ताब्यात

प्रशासनाकडून कार्यवाही सुरु

इगतपुरी (प्रतिनिधी) : इगतपुरी तालुक्यातील गडगडसांगवी येथील स्वस्त धान्य दुकानात वाटप करून शिल्लक राहिलेल्या धान्याचे३२ कट्टे काळ्या बाजारात विक्रीसाठी चाललेले असताना ग्रामस्थांच्या सतर्कतेने मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

स्वस्त धान्य दुकान नं १११ चे दुकानदार बाळासाहेब रामजी मते यांनी अर्धवट धान्य वाटप करून उरलेले धान्य आज धान्याने भरलेले पोते रिकामे करून प्लास्टिक गोणीत भरले. उरलेला माल वाटप न करता काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असता ग्रामस्थांनी ते स्वतः पकडले. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी याबाबतची दखल घेऊन पुरवठा विभागाचे पथक घटनास्थळी पाठवले आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनीही दखल घेतली आहे.

मुराबी गडगडसांगवी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रतन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बेंडकुळी, माजी पोलीस पाटील दत्तु पुंजाजी शिंदे, दिलीप शिंदे, खंडू बेंडकोळी, सुकदेव शिंदे, नथु भोई, समाधान भोई, बालाजी तळपाडे, पंडित शिंदे, नवनाथ शिंदे, प्रभाकर शिंदे, संदीप शिंदे, काळु वाघ, हनुमंता वाघ, गजीराम बेंडकुळी,अशोक शैडे, रामदास पाटील शिंदे, मंगलाबाई पाडेकरं, चंदाबाई बेंडकोळी, ठकुबाई पुरकुले, हिराबाई पाडेकर, सुन्याबाई पाडेकर, चंदाबाई मोर आदी ग्रामस्थांनी ही मोहीम फत्ते करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत तहसील अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही सुरु झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -