Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीमुलीने बांधली राखी अन् बनली ‘लव्ह जिहाद’ची शिकार

मुलीने बांधली राखी अन् बनली ‘लव्ह जिहाद’ची शिकार

अहमदनगर (प्रतिनिधी) : हिंदू अल्पवयीन मुलीने भाऊ समजून सलमान शेखला बांधली राखी आणि पीडित मुलगी बनली लव्ह जिहादची शिकार, अशी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर शहरातील या गंभीर घटनेची अधिक माहिती अशी की, शहर परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय बारावीत शिक्षण घेत असणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर सलमान शेख रा. अहमदनगर याने पीडित मुलगी हिंदू समाजाची आहे, हे माहीत असतानादेखील सलमान शेख याने रक्षाबंधन सणाचे निमित्त साधून भाऊ बनण्याचा बनाव रचून एका हिंदू अल्पवयीन मुलीला फसवले. तिच्याकडून राखी बांधून घेतली. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी दुपारी सदर पीडित तरुणी कॉलेजला जात असताना आरोपी सलमान शेख या व्यक्तीने तिला रस्त्यात अडवून तिच्यासोबत जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. सोबत न आल्यास त्याने जिवे मारण्याची धमकी देखील दिली.

आरोपी सलमान शेख अल्पवयीन हिंदू विद्यार्थिनीला अहमदनगर सिद्धिबाग परिसरात जबरदस्तीने नेऊन तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केले. यावेळी पीडित मुलीने स्थानिक भागात जोरात आरडाओरड केली असता मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक गोळा झाले. नागरिकांनी पोलिसांना बोलवून घेतले त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये नेऊन पीडित मुलीकडे पोलिसांनी विचारपूस करून तिचा जबाब नोंदविला. तिच्या घरच्यांना बोलवून या विषयासंदर्भात अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला.

या घटनेने परिसरासह अहमदनगर शहरात पालक वर्गात प्रचंड घबराट उडाली असून याबाबत आरोपी सलमान शेख याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. या आरोपीने इतर मुलींबाबत असे प्रकार केले आहेत का? याचा काटेकोरपणे शोध घेणार असल्याचे पोलीस सूत्रांनि सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -