Tuesday, March 25, 2025
Homeमहत्वाची बातमीज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचे निधन

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचे निधन

मुंबई (वार्ताहर) : प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य अभिजीत सेन यांचे मंगळवारी निधन झाले. सोमवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडीज अँड प्लॅनिंगमध्ये प्राध्यापक असलेले अभिजीत सेन देशासाठी काम करणाऱ्या अनेक आर्थिक समित्यांचे सदस्य आणि अध्यक्षही होते.

मूळचे जमशेदपूरचे असलेले अभिजित सेन २००४ ते २०१४ या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये नियोजन आयोगाचे सदस्य होते. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली. १९८५ मध्ये ते जेएनयूमध्ये आले आणि निवृत्तीपर्यंत इथेच राहिले. तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय होते.

१९९७ मध्ये अभिजीत हे कृषी मंत्रालयाच्या कृषी आणि सहकार विभागाद्वारे कृषी उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी नेमलेल्या आयोगाचे अध्यक्ष होते. ग्रामीण अर्थशास्त्र आणि कृषी विषयांचे तज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. त्याचप्रमाणे ते घाऊक किंमत निर्देशांक समितीचे अध्यक्ष होते.

आर्थिक सल्लागार म्हणून ते आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, अन्न आणि कृषी संघटना, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि आशियाई विकास बँक यांच्याशीही संबंधित होते. २०१०मध्ये त्यांना सार्वजनिक सेवेसाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१४ मध्ये एनडीए सत्तेवर आल्यावर, “दीर्घकालीन अन्न धोरण” तयार करण्यासाठी सेन यांना उच्चस्तरीय कार्य दलाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले.

सेन हे अनेक जागतिक संशोधन आणि बहुपक्षीय संस्था जसे की यूएनडीपी, आशियाई विकास बँक, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना (एफएओ), कृषी विकासासाठी आंतरराष्ट्रीय निधी आणि ओईसीडी विकास केंद्र यांच्याशी देखील संबंधित आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -