रत्नागिरी (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून कोकणात यायला अनेक पर्याय असले, तरी प्रवाशांनी प्रामुख्याने रेल्वेलाच पसंती दिली आहे. उभ्याने येऊ पण रेल्वेनेच येऊ, असे म्हणत अनेक चाकरमानी गणपतीचा जयजयकार करीत कोकणात दाखल होत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्या खालोखाल सिंधुदुर्ग, रायगड यांचा समावेश होतो. रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे एसटी असो वा प्रायव्हेट लक्झरी गाड्या यातून यायला ८ ते १२ तास लागत आहेत. हा प्रवास अत्यंत तापदायक असून अनेक प्रवाशांनी रेल्वेला पसंती दिली आहे. एसटीच्या गाड्यांची संख्या जरी वाढली असली तरी एसटीसाठी लागणारा वेळ, दुरवस्थेमुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे गणेशभक्तांचा वेळ वाया जात आहे. ३०० ते ३५० कि.मी.साठी सहा तासाऐवजी १४ ते १५ तास लागत आहेत. तसेच रस्त्यावरुन प्रवास करताना पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात. डोके दुखणे कंबर खचणे याला जनता वैतागली असून अनेक चाकरमान्यांनी रेल्वेनेच येणे पसंत केले.
सुसाट येणारी रेल्वे कमीत कमी वेळात जिल्ह्यात दाखल होत असून रेल्वेमधून येताना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही आणि प्रवासाचे भाडेही कमी त्यामुळे रेल्वेचा प्रवास फायदेशीर ठरत आहे. राज्यकर्त्यांनी आश्वासने बंद करुन रत्नागिरी रेल्वेचे दुपदरीकरण कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. येथील लोकप्रतिनिधींनी रेल्वेबरोबरच समुद्र वाहतुकीलाही प्राधान्य द्यावे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतूक सुखकर होण्याच्यादृष्टीने अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या. तसेच सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्पीड बोटी सुरू होण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करून रेल्वे आणि जलवाहतूक कशा दृष्टीने सुखकर होईल त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसला पाच डबे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून तुतारी एक्स्प्रेस शनिवारपासून २४ डब्यांची धावू लागली आहे. त्याचा अनेक चाकरमान्यांनी फायदा करून घेतला आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…