लासलगाव विंचूर रस्त्यावर मोटरसायकलच्या धडकेत एक ठार, दोन गंभीर जखमी

  114

लासलगाव (वार्ताहर) : लासलगाव-विंचूर रस्त्यावर मंजुळा पॅलेससमोर दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातील दोन्ही गंभीर जखमींवर लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नासिक येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रावण सोमनाथ पवार रा. विंचूर हा मोटरसायलवरून विंचूरकडून लासलगावच्या दिशेने येत असताना तसेच अमोल भाऊलाल भालेराव व रवींद्र नामदेव जाधव दोन्ही राहणार लासलगाव हे मोटरसायलवरून लासलगावकडून विंचूरच्या दिशेने जात असताना मंजुळा पॅलेससमोर दोन्ही मोटारसायकलस्वारांमध्ये समोरासमोर धडक झाली. त्यात श्रावण सोमनाथ पवार हा जागीच ठार झाला. तर अमोल भाऊलाल भालेराव, रवींद्र नामदेव जाधव हे दोन्ही गंभीर जखमी झाले.


अपघाताची खबर मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी योगेश शिंदे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लासलगांव ते विंचूर या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर अनेकवेळा अपघात होत असल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.


लासलगाव ते विंचूर रस्त्यावर मोठया प्रमाणावर वाहनांची रहदारी असल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. याच ठिकाणी मागे रिक्षा व हायवा यांच्यात अपघात होऊन ५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या रस्त्याचे चौपदरीकरण तातडीने करण्यात यावे, तसेच गतिरोधक बसविण्यात यावे.- महेंद्र हांडगे, सामाजिक कार्यकर्ते, लासलगाव

Comments
Add Comment

बापाने उचललं टोकाचं पाऊल, चार मुलांसह विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या

राज्यात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा!

राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता मुंबई: भारतीय हवामान विभागाने

गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2500 फेऱ्या

कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन

'शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, पण टिकवता आली... मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा वाद हा काही राज्याला नवा नाही. मंत्री गणेश नाईक

पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या सुरक्षेची जबाबदारी काही तृतीयपंथीयांवर देण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या

पोलीस अधिकाऱ्याची आंदोलकाला फिल्मी स्टाईल लाथ का मारली? पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं

गेल्या दोन दिवसापासून जालन्यातील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलीस उपाधिक्षक अनंत कुलकर्णी असं या अधिकाऱ्यांचे