कॅनबेरा (वृत्तसंस्था) : झिम्बाब्वेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मालिकेतील उर्वरित सामन्यांतून माघार घ्यावी लागली आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतूनही त्याला वगळण्यात आले आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मिचेल मार्शलच्या घोट्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे मार्श पर्थ येथे परतेल. येत्या २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या दौऱ्यापूर्वी मार्श दुखापतीतून सावरेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत मार्शबाबत ऑस्ट्रेलियाचा संघ कोणतीही जोखीम घेणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यात सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील एक सामना झाला असून आणखी दोन सामने खेळले जाणार आहे. या सामन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे.