उरण (वार्ताहर) : उरणमध्ये गुटखा विक्रेत्यांची धरपकड करण्यात आली आहे; परंतु ठोस कारवाई न केल्यामुळे दोन तीन दिवसांत पुन्हा गुटखा विक्री सुरू करण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र गणेशोत्सव दोन दिवसांवर आलेला असतानाही मिठाई विक्रेत्यांवर कारवाई होण्याऐवजी त्यांना प्रशासनाकडून अभय दिला जात असल्याची चर्चा उरण परिसरात सुरू आहे.
याबाबत प्रशासनाविरोधात अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने नबाकांत प्रफुल्ल अधेक, पंकज गोपाळ गुप्ता, अमित श्यामकांत शर्मा, राहुल कैलास गुप्ता, बाबु सुवर्ण तौडा, सदानंद बाबू नायर यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ड्रेनेजच्या टाकीवर हॉटेलचे किचन व मिठाई विक्रेत्यांकडून नियमांची सर्रासपणे पायमल्ली केली जात असल्याची लेखी तक्रार उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. त्या तक्रारीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वी गुटखा विक्रेत्यांची धरपकड केली होती; परंतु याची अधिकृत माहिती प्रशासनाने दिलेली नाही. मात्र उरणमधील गुटखा माफियांवर कारवाई नाही. या कारवाईमुळे टपरी धारकांनी काही दिवस टपरी बंद ठेवली होती. पुन्हा टपरी सुरू करून गुटखा व इतर नशिली पदार्थांची विक्री सुरू केली आहे.