मुंबई : मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो ३ ची आज ट्रायल यशस्वी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रो ३ ची ट्रायल झाली. तर दुसरीकडे आरे कारशेडमुळे तेथील पर्यावरणाला धोका निर्माण होईल म्हणून पर्यावरणवाद्यांचा या कारशेडला विरोध असतानाच दुसरीकडे आज मेट्रो ३ ची ट्रायल पार पडली आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.
आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी झाली. एकीकडे आरे कारशेडला मोठ्या प्रमाणावर पर्यावरणवाद्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे सरकारने याला मंजूरी देऊन काम सुरू केले आहे. सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत सुरु करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न असणार आहे.
आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा प्रचंड विरोध होत असतानाही मात्र ट्रायल करण्यात आली आहे. तर कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-३ चे भुयारीकरणाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम ६७ टक्के पूर्ण झाले आहे.
मेट्रो ३ ला कोणीही थांबवू शकत नाही. मेट्रो ३ ही मुंबईची लाईफलाइन आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आरे कारशेडला मंजूरी दिली आहे. जवळपास १७ लाख लोक मेट्रो वापरतील आणि ७ लाख वाहन रस्त्यावर धावायची कमी होतील. तसेच मेट्रोमुळे पर्यावरणाचा धोका कमी होईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…