मुंबई (वार्ताहर) : महिलांची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता बेस्टतर्फे महिलांसाठीच्या बसेसची संख्या वाढवून २०० पर्यंत वाढविण्याच्या तयारीत आहेत. सध्या १३७ वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित बसेस आहेत. त्याशिवाय अतिरिक्त ७० बसेस उपलब्ध करून देणार आहोत, असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितले.
“महिला प्रवाशांचा, विशेषतः कामावर जाणाऱ्या महिला वर्गाचा बेस्टला चांगला प्रतिसाद आहे. महिलांसाठी खास तेजस्विनी बसेस असल्या तरी, नियमित बसेस फक्त महिलांसाठी गर्दीच्या वेळी धावतात, असे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या शहरात बेस्टमध्ये दोन महिला चालक आणि ९० महिला बस कंडक्टर आहेत. “नियमित बसमध्ये महिलांसाठी विशेष रांगेची व्यवस्था आहे. असे ४० हून अधिक मार्ग आहेत, जेथे महिलांसाठी विशेष रांगा आहेत. सध्या महिला-विशेष बससाठी ५५ मार्ग आहेत,” लोकेश चंद्रा यांनी सांगितले.