Thursday, July 10, 2025

Video : ‘मोदी एक्स्प्रेस'ला हिरवा झेंडा! गणपतीची आरती म्हणत चाकरमानी मुंबईहून कोकणात रवाना!

Video : ‘मोदी एक्स्प्रेस'ला हिरवा झेंडा! गणपतीची आरती म्हणत चाकरमानी मुंबईहून कोकणात रवाना!

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून व अभिनव प्रवास योजनेतून आकारास आलेल्या ‘मोदी एक्स्प्रेस’ गणपती विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गणपती बाप्पांची आरती म्हणत गणेशभक्तांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ मुंबईहून कोकणाच्या दिशेने सुस्साट रवाना झाली.


आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून सुरू करण्यात आलेली ही ‘मोदी एक्स्प्रेस’ सकाळी ११ वाजता कोकणाच्या दिशेने प्रवासास निघाली आणि चाकरमान्यांनी एकच जल्लोष केला. ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष करत चाकरमानी गणेशभक्त कोकणात आपल्या गावच्या दिशेने मोठ्या आनंदात रवाना झाले.



कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नव्हते. त्यांची ही व्यथा जाणून व कोकणवासियांचा विचार करून आमदार नितेश राणे यांनी चाकरमान्यांना आनंदाने आणि मोफत गावी जाता यावे यासाठी एक्स्प्रेसची खास व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच नितेश राणेंनी या ट्रेनसंदर्भात घोषणा केली होती. अखेर आज गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ ने कोकणाकडे प्रवास सुरू केला.

Comments
Add Comment