काबूल (वृत्तसंस्था) : आशिया चषक स्पर्धेतील रविवारच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केल्यानंतर जगभरातील भारतीय चाहत्यांनी आनंद साजरा केला. विजयाच्या सेलिब्रेशनचा असाच एक व्हीडिओ खूप चर्चेत आहे. हा व्हीडिओ भारतामधून नसून अफगाणिस्तानचा आहे.
भारताच्या या विजयानंतर चाहत्यांनी रात्रभर जल्लोष केला. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये अफगाणिस्तानचे चाहते भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर जल्लोष साजरा करताना दिसत आहेत.
व्हीडिओमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर एक अफगाण चाहता त्याच्या जागेवरून उठतो आणि टीव्ही स्क्रीनवर हार्दिक पंड्याला किस करून रूममधून बाहेर जातो. सोशल मीडियावर या व्हीडिओला खूप पसंती दिली जात आहे.