Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडी'बॉयकॉट'चा 'ब्रह्मास्त्र'ला फटका!

‘बॉयकॉट’चा ‘ब्रह्मास्त्र’ला फटका!

'मला गोमांस खायला आवडतं' या वक्तव्याने रणबीर कपूर अडचणीत

मुंबई : अलीकडेच आमिर खानचा लाल सिंग चड्ढा #BoycottLaalSinghChaddha आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधन #RakshaBandhanmovie या चित्रपटांना बॉयकॉट ट्रेंडचा #BoycottRakshaBandhanmovie मोठा फटका बसला. आता रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाला बॉयकॉट #BoycottBrahmastra करायची जोरदार मागणी सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

बॉलिवूडचे आगामी चित्रटही बॉयकॉटच्या विळख्यात सापडलेले दिसत आहेत. नेटकरी आगामी इतरही मोठ्या स्टार्सच्या आणि स्टारकिड्सच्या चित्रपटांना बॉयकॉट करताना दिसत आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’, हृतिक रोशनचा ‘विक्रम वेधा’, सलमान खानचा ‘टायगर ३’ आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांना बॉयकॉट करायची जोरदार मागणी सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

रणबीर कपूरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तो मला गोमांस खायला आवडते, असे म्हणतोय. त्याच्या या जुन्या वक्तव्यामुळे आता ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

रणबीरचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ ‘रॉकस्टार’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या काळातील आहे. त्या चित्रपटात रणबीर मुख्य भूमिकेत होता. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. पण या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने एक धक्कादायक वक्तव्य केले होते. खाण्यावर आपले किती प्रेम आहे? हे रणबीर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगत होता. पण त्याचबरोबरीने तो म्हणाला, ‘मला गोमांस खायला आवडतं.’ त्याचे हे जुनं वक्तव्य आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

“आम्ही गोमांस खाणाऱ्या कलाकाराला प्रोत्साहन देत नाही”, ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाला बॉयकॉट करा अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत”. अशा कलाकारांना आणि त्यांच्या चित्रपटांना बॉयकॉट करा असेही नेटकरी म्हणत आहेत. त्यामुळे ब्रह्मास्त्रच्या प्रदर्शनापूर्वीच त्याला मिळत असलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांचा चित्रपटाला नुकसान होईल अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाचा पहिला भाग ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासह अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अशी दिग्गज मंडळी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातून रणबीर आणि आलिया ही जोडी पहिल्यांदाज मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. तर नागार्जुनदेखील ब-याच काळानंतर हिंदीत दिसणार आहेत. त्यांनी बिग बींपेक्षा जास्त मानधन घेतल्याची चर्चा आहे. ‘ब्रह्मास्त्र’मधील सर्वच गाणी गाजत आहेत.

https://twitter.com/Iamsanjusingh1/status/1558052714629607424/photo/1

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -