नवी दिल्ली : भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले असून सामन्यापूर्वी दुबईत संघात सामील होणार आहेत. आशिया चषक २०२२ मध्ये टीम इंडिया २८ ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
आशिया चषकापूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर द्रविडला विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणने प्रशिक्षकाची भूमिका निभावली. द्रविडला संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर, बीसीसीआयने लक्ष्मणला अंतरिम प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेहून दुबईला पाठवले जेथे टीम इंडियाने त्याच्या देखरेखीखाली सराव सत्रे घेतली.