दीपक परब
गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. लाडक्या बाप्पांचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा परिवार सज्ज झाला आहे. स्टार प्रवाह परिवारच्या ‘गणेशोत्सव २०२२’ या गणपती विशेष कार्यक्रमात यंदा ‘अष्टविनायकाचा गजर’ होणार आहे. स्टार प्रवाह परिवारातील १०० कलाकार एकत्र येऊन अष्टविनायकाच्या कधीही न ऐकलेल्या कथा ह्या नृत्य आणि गोष्टींच्या माध्यमातून सादर करतील. आजीच्या गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो. हे मंतरलेले दिवस या गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवता येणार आहेत. स्टार प्रवाह परिवारातल्या बच्चेकंपनीला अष्टविनायकाच्या या कथा आजीच्या तोंडून ऐकायला मिळणार आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वात असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचेच लाडके दैवत. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’, म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो. भक्तिमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य निर्माण करतात.
स्टार प्रवाह वाहिनीने ‘मराठी परंपरा मराठी प्रवाह’ हे ब्रीदवाक्य प्रत्येक कार्यक्रमांतून जपले आहे. त्यामुळे ‘गजर अष्टविनायकाचा’ हा कार्यक्रम देखील पुन्हा एकदा मराठी परंपरेचे दर्शन घडवणार आहे. या कार्यक्रमात गणपतीच्या आवडीच्या पाच गोष्टींवर आधारित एक खास गाणे देखील बनवण्यात आले आहे. ‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’मधील स्पर्धकांच्या आवाजाने हे गाणे नटले आहे. अष्टविनायकाच्या कथांसोबतच सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचा आस्वादही प्रेक्षकांना घेता येणार आहे. त्यासोबतच नंदेश उमप यांनी सादर केलेला ‘लोककलेचा जागर’ या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवेल.
स्टार प्रवाह परिवाराचा गणपती असल्यामुळे या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचे खास निमंत्रण आहे. रविवार २८ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येणार आहे.
टीव्हीचा वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १६’ लवकरच नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा होस्ट सलमान खान या सीझनसाठी १५व्या सीझनपेक्षा तिप्पट जास्त फी आकारणार आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. ‘बिग बॉस’च्या नव्या सीझनची घोषणा होताच या शोशी संबंधित अनेक चर्चांचा फेरा सुरू झाला आहे. स्पर्धकांनंतर आता शोचा होस्ट सलमान खानशी संबंधित माहिती समोर येऊ लागली आहे.
‘बिग बॉस १६’साठी सलमान किती फी आकारणार, याचा खुलासा करण्यात आला आहे. त्या रिपोर्टनुसार, सलमान खान ‘बिग बॉस १६’ साठी वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘केजीएफ: चॅप्टर २’च्या बजेटपेक्षा दहापट जास्त फी आकारणार आहे. रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, सलमान खान या नव्या सीझनसाठी सुमारे १००० कोटी रुपये इतके मानधन घेणार आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून ‘बिग बॉस १६’चे सूत्रसंचालन करत आहे. यंदाच्या पर्वातदेखील भाईजानचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सलमानने ‘बिग बॉस १६’च्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यामुळे लवकरच ‘बिग बॉस १६’चा प्रोमो आऊट होणार आहे.
कनिका मान, ट्विंकल कपूर यांची नावे… सलमानने बिग बॉसच्या १५व्या सीझनसाठी ३५० कोटी रुपये फी आकारली होती. तर, आता त्याने नव्या सीझनसाठी तिप्पट फी मागितली आहे. म्हणजेच ‘बिग बॉस १६’साठी भाईजान सुमारे १००० कोटी रुपये आकारणार आहे. ‘बिग बॉस’च्या नव्या सीझनच्या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘बिग बॉस १६’च्या अपडेटमध्ये शोच्या प्रीमियरच्या तारखेपासून ते सलमान खानच्या फीपर्यंत अनेक बातम्या चर्चेत आल्या आहेत. आता या शोच्या काही संभाव्य स्पर्धकांची नावे देखील पुढे आली आहेत. यामध्ये मुनव्वर फारुकी, कनिका मान, ट्विंकल कपूर, विवियन डिसेना, फैसल शेख, शिविन नारंग आणि फरमानी नाज यांच्या नावांचा समावेश आहे.
देवमाणूस’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ‘देवमाणूस २’ मालिकेत येणारे नव-नवे ट्विस्ट प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे ‘देवमाणूस २’ मालिकेचा चाहतावर्ग नाराज झाला आहे.
‘देवमाणूस २’ मालिकेत अजितकुमारला अटक झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. देवमाणूस मालिकेच्या इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत अजितला अटक झालेली असून तो खाली बसलेला दिसत आहे. अजितसोबत इन्स्पेक्टर जामकर आणि काही पोलीसदेखील दिसत आहेत.
या आधी ‘देवमाणूस’ या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे ‘देवमाणूस’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तेव्हाही चाहते नाराज झाले होते. त्यानंतर ‘देवमाणूस २’ मालिका येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली. ‘देवमाणूस २’ ही मालिका रंजक बनवण्यासाठी अनेक पात्रांची मालिकेत एन्ट्री करण्यात आली. पण आता ही मालिकाच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ येतेय भेटीला‘देवमाणूस २’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेच्या जागी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सुरू होणार आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षक आता मालिकेची प्रतीक्षा करत आहेत.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…