मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवात मुंबई दौऱ्यावर येणार आहे. लालबागचा राजा आणि सिद्धीविनायकाचेही दर्शन घेणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षावरही जाणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचीही अमित शाह भेट घेणार असून त्यांच्या घरच्या गणपतीचंही दर्शन घेणार आहेत. अमित शाह दरवर्षी मुंबईत येऊन गणपतीचं दर्शन घेत असतात. त्याप्रमाणे यंदाही त्यांचा दौरा ठरला आहे. पण सत्तांतरानंतरचा हा पहिला मोठा दौरा असणार आहे.