मुंबई : “उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्र मंडळ सोबत सुद्धा युती करतील.” अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली आहे की ते सैराट मित्र मंडळ सोबत सुद्धा युती करतील.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 26, 2022
शिवसेनेने काल संभाजी ब्रिगेड या संघटनेसोबत युती केल्याची घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई हेही उपस्थित होते. या युतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून शिवसेनेवर अनेकांकडून टोलेबाजी करण्यात येत आहे.
तसेच ठाकरेंची सत्ता गेल्यापासून त्यांनी काही बिनकामाचे रिकामटेकडे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह केली आहेत जे फक्त शिव्या घालण्यासाठी आहेत. ठाकरेंसारखीच अवस्था त्यांची आहे, समोरून काय करू शकत नाही, आदित्यचे कार्टून विधिमंडळाच्या बाहेर झळकले तरी सुद्धा ठाकरे गटाचे आमदार गप गार होते, असे ट्विट करत निलेश राणे यांनी ठाकरे गटाला डिवचले आहे.
ठाकरेंची सत्ता गेल्यापासून त्यांनी काही बिनकामाचे रिकामटेकडे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह केली आहेत जे फक्त शिव्या घालण्यासाठी आहेत. ठाकरेंसारखीच अवस्था त्यांची आहे, समोरून काय करू शकत नाही, आदित्यचं कार्टून विधिमंडळाच्या बाहेर झळकलं तरी सुद्धा ठाकरे गटाचे आमदार गप गार होते.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 27, 2022
मनसेच्या राजू पाटील यांनीसुद्धा शिवसेनेवर टीका केली असून, “सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली.” अशी फेसबुक पोस्ट राजू पाटील यांनी केली होती.