Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणलळित यांनी घेतली भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

लळित यांनी घेतली भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा

नवी दिल्ली : जस्टीस उदय उमेश लळीत यांनी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. एन. व्ही. रमणा यांच्या सरन्यायाधीशपदाचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी संपला आहे. त्यानंतर रमणा यांनी लळीत हे आपले उत्तराधिकारी झाले आहेत. न्यायमूर्ती उदय उमेश लळीत म्हणजेच यू. यू. लळीत सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. लळीत यांच्या नियुक्तीने कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. उदय लळीत ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

कोणत्याही हायकोर्टाचे न्यायाधीश नसतानाही उदय लळीत हे देशाचे सरन्यायाधीश झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. या अगोदर १९७१ मध्ये देशाचे १३ वे सरन्यायाधीश एस. एम. सिकरी यांना सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली होती.

विजयदुर्गजवळ असलेले गिर्ये हे न्यायाधीश उदय लळीत यांचे मूळ गाव आहे. आजही आठ ते दहा लळीत कुटुंब या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे २०० वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबाचे काही कारणाने कुंभवडे, पेंढरी, हरचेली चुना कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोहाजवळ आपटे या गावी स्थलांतर झाले होते. लळीतांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे.

उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते १९७४ ते ७६ या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. जून १९८३ मध्ये न्यायाधीश उदय लळीत यांनी वकिलीला सुरुवात केली. उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्ष वकिली केली. नंतर ते दिल्लीत गेले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -