मुंबई (प्रतिनिधी) : एकीकडे मुंबई विद्यापिठाच्या कलिना कँम्पसमधे कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधून पुर्ण झालेल्या किंवा अर्धवट अवस्थेत असलेल्या अनेक वास्तू विनावापर धुळ खात पडलेल्या आहेत. चुकीच्या बांधकामामुळे स्विमिंग पुलही अनेक वर्ष अर्धवट अवस्थेत आहे. विद्यापीठ संकुलात डेंगुच्या अळ्या सापडत आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कलिना कॅम्पसमधील विकास कामे अर्धवट सोडून विद्यापिठाच्या कुलगुरुंनी मात्र सिंधुदुर्गात भूमी पूजन व इमारत उद्घाटनाचा घाट घातल्याची टीका युवासेनेकडून करण्यात आली आहे. स्विमिंग पूलचे काम हे आपल्या काळात झाले नाही, परंतु त्याची डागडुजी आपल्या कालावधीत करणे ही आपली नैतिक जवाबदारी होती, हे सर्व अतिशय निंदनीय तर आहेच, पण विद्यार्थ्यांच्या पैशांचा अपव्यय देखिल असल्याचे युवा सेनेच्या सीनेट सदस्यांनी म्हटले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर स्विमिंग पूल बांधकामावर केलेला करोडो रुपयांचा खर्च पूर्णपणे वाया गेल्याच कुलगुरुंनी त्वरीत जाहीर करुन संबंधित अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी युवासेना सीनेट सदस्यांनी केली आहे. या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या विद्यापीठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात येणार आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…