
मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबई - गोवा महामार्गाची पाहणी केली. चौपदरीकरणाला विलंब, सरकारमुळे नव्हे तर त्यासाठी ठेकेदार जबाबदार आहेत. सुरूवातील हे काम दोन जणांकडे होते. मात्र, आता १० ठेकेदारांना काम देण्यात आले असल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. तर लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी ते म्हणाले की कशेडी घाटत २ नवीन बोगदे बांधण्यात येत आहेत. एक बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे, डिसेंबर २०२२ पर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी खुला होईल. तर दुसरा बोगदा २०२३ मध्ये सुरु होणार आहे. सुमारे नऊ किमी चा हा ४ लेन बोगदा आहे यामुळे प्रवासाची सुमारे एक तास कमी लागणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल असं रवींद्र चव्हाणांनी सांगितलं. मुंबई गोवा महामार्गावरून नितीन गडकरींवर टीका करणाऱ्या विरोधकांनावरही रवींद्र चव्हाणांनी जहरी टीका केली. कशेडी बोगद्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काम जलद होत असून आजूबाजूच्या वाडीतील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्याची व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना यावेळी दिल्या.
जिथे दोन जण काम करत होते तिथे आम्ही १० जण कामाला लावली आहेत. तटकरे यांनी कितीही टीका केली तरी आमचे सरकार हे गतीमान आहे. भविष्यात कल्याण-डोंबिवली आणि इतर शहरातही खड्डे बुजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावरही रवींद्र चव्हाण यांनी पलटवार केला आहे. तटकरे काय म्हणतात, याला महत्त्व नाही. त्यांना खरेच वाटत असावे की भाजपा आणि शिंदेंचे सरकार हे गतीमान सरकार आहे, म्हणून ते बोलले असतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ती त्यांना भरघोस निधी नगर विकास खात्यातून या सगळ्या महापालिकांना द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.