Friday, June 13, 2025

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पूलाजवळ अपघात

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा येथे घाटात अमृतांजन पूलाजवळ अपघात झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.


गणपती उत्सवामुळे मुंबईहून अनेक लोक गावी जात असल्यामुळे महामार्गावर जास्त गर्दी आहे. त्यात हा अपघात घडल्यामुळे वाहनांच्या दीड ते दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या असून सलग सुट्ट्या, गणपती उत्सवामुळे पर्यटकांच्या आणि कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या जास्त आहे.


दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment