Friday, April 25, 2025
Homeदेशमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता २९ ऑगस्टला!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता २९ ऑगस्टला!

नवी दिल्ली : शिवसेनेच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवले होते. त्यानुसार आज सुनावणी होणे अपेक्षित होते पण ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. २९ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात होती. वारंवार तारीख पुढे जात असल्याने शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्णमुरारी यांच्याच खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले.

या वादावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत असून आता ही सुनावणी २९ ऑगस्टला होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -