वसई (वार्ताहर) : वसईची प्रतिभावंत युवा खेळाडू सान्वी वीरेन पाटील हिने नुकत्याच कोलकाता येथे झालेल्या वाको इंडिया युवा आणि कॅडेट गट राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीमुळे सान्वी ही इटलीमध्ये ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत खेळवल्या जाणाऱ्या जागतिक ज्युनियर किकबॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. जागतिक स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील पहिली ज्युनियर किकबॉक्सर आहे.
सान्वी गेली ४ वर्षे राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करीत आहे. तिने इंडियन ओपन २०२० स्पर्धेची ग्रँड ट्रॉफी पटकावण्याचाही पराक्रम केला आहे.