Thursday, September 18, 2025

'लोकसभा प्रवास योजनेतून' जाणून घेणार नागरिकांच्या समस्या; बिश्वेश्वर टुडू यांचा पालघर दौरा

'लोकसभा प्रवास योजनेतून' जाणून घेणार नागरिकांच्या समस्या; बिश्वेश्वर टुडू यांचा पालघर दौरा

कुडूस (वर्ताहर) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोकसभा प्रवास योजना सुरू केली आहे. या अंतर्गत देशभरातील विविध लोकसभा क्षेत्रांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून यामाध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

सदर योजने संदर्भात माध्यमांना माहिती देताना पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी सांगितले की, या योजनेत पालघर लोकसभा क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत पालघर लोकसभाची जबाबदारी केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री बिश्वेश्वर टुडू यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान पालघर लोकसभेचा प्रवास करून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान २४ ऑगस्ट रोजी वसई तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. तर २५ ऑगस्टला सकाळी ९ वा. मनोर येथे स्वागत होऊन मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर व वारली हट या विकास कामांना भेट देऊन पुढे लोकप्रतिनिधी सोबत बैठक व विक्रमगड तालुक्यातील टेटवाली येथील बुथप्रमुख यांना भेट देणार आहेत. त्यानंतर जव्हार मधील उबंरवागंन येथे जनते सोबत संवाद तर पुढे जव्हार येथे महिला मोर्चा पदाधिकारी यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले आहे.

तसेच तलासरी येथे कार्यकर्त्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. २६ ऑगस्ट रोजी डहाणू येथे समाजातील ज्येष्ठ मान्यवरांसोबत चहापान व समस्या बाबत चर्चा, पुढे बोईसर येथे व्यापारी प्रतिनिधी संवाद, पालघर येथे अमृत महोत्सव बाईक रॅली, नंतर युवामोर्चा पदाधिकारी व नवमतदार संवाद, जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी यांचे सोबत आढाव बैठक घेऊन संध्याकाळी चार वाजता पत्रकार बांधवांशी वार्तालाप करुन मंत्री टुडू दिल्लीकडे रवाना होतील, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी दिली.

Comments
Add Comment