Tuesday, July 1, 2025

सहा महिन्यांनंतर क्लीन-अप मार्शल पुन्हा नियुक्त

सहा महिन्यांनंतर क्लीन-अप मार्शल पुन्हा नियुक्त

मुंबई (वार्ताहर) : सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबईतील रस्त्यांवर पुन्हा क्लीन-अप मार्शल तैनात असल्याचे पाहायला मिळतील. शहरातील सर्व २४ प्रशासकीय वॉर्डांमध्ये पुन्हा नवीन मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत.


सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना, कचरा फेकणाऱ्यांना दंड करण्यासाठी पालिकेने शहरात क्लीन अप मार्शल नेमले. कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीकरिता क्लीन-अप मार्शलने दंड वसुलीही केली आहे. क्लीन-अप मार्शल तैनात करण्यासाठी एजन्सींसोबतचा पूर्वीचा करार या वर्षी मार्चमध्ये संपला. त्यामुळे सहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर शहरातील सर्व २४ प्रशासकीय वॉर्डांमध्ये पुन्हा नवीन मार्शल नियुक्त करण्यात आले आहेत.


लोकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि थुंकणे हे प्रकार थांबवण्याकरिता दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे आम्ही पुन्हा क्लीन अप मार्शल नियुक्त केले असल्याचे, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित प्रभागात नियुक्त केलेल्या प्रत्येक एजन्सीला ३० मार्शल नियुक्त करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यांना दिलेल्या एका महिन्याच्या कालावधीत सर्व मार्शलची पोलीस पडताळणी करून घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment