नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आगामी आशिया चषक स्पर्धेनिमित्त महामुकाबला होणार आहे. हा सामना २८ ऑगस्टला खेळला जाणार आहे. आशिया चषक स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध भारताचेच पारडे जड असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
आशिया चषक स्पर्धेत भारताची सलामीला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. रविवार २८ ऑगस्टला उभय संघांमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महामुकाबला होणार असून जगभरातील क्रीडा रसिकांसाठी पर्वणीच आहे. तत्पूर्वी उभय संघांमध्ये आशिया चषक स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यांचा विचार केल्यास भारतच सरस असल्याचे दिसते.
आतापर्यंत आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान १४ वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. यात भारतीय संघाचेच पारडे जड असल्याचे दिसून आले आहे. भारताने पाकिस्तानला या १४ पैकी ८ सामन्यांत धूळ चारली आहे. तर पाकिस्तान ५ सामने जिंकण्यात यशस्वी राहिला आहे. याशिवाय एका सामन्याचा निर्णय लागला नसल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान आगामी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलामीची लढत होणार आहे. या सामन्यावर जगभरातील क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.