Tuesday, July 1, 2025

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की, सत्ताधारी-विरोधक समोरासमोर

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की, सत्ताधारी-विरोधक समोरासमोर

मुंबई : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व गोंधळ घडला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार धक्काबुक्की झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक समोरासमोर आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले.


पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ घडला. यावेळी सत्ताधारी-विरोधका आमने-सामने आणि राडा झाला. कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, वाझेचे खोके- मातोश्री ओके, लवासाचे खोके-बारामती ओके, अशा घोषणा सत्ताधारी पक्षाने दिल्या. तर ‘५० खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ 'गाजर देणे बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा', अशा गगनभेदी घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.


विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले व त्यांच्यात धक्काबुक्कीही झाल्याचे दिसून आले. शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.


महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असे असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >